Other

नाले सफाई, जलनिचरा मोहीम आणि धाडी नदी परिसरात वाढवली गस्त; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर फैजपूर नगरपरिषदेची आपत्कालीन तयारी
नाले सफाई, जलनिचरा मोहीम आणि धाडी नदी परिसरात वाढवली गस्त; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

फैजपूर | प्रतिनिधी

जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ‘रेड अलर्ट’च्या पार्श्वभूमीवर फैजपूर नगरपरिषद प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी तातडीच्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील संभाव्य पूरस्थिती टाळण्यासाठी विविध विभागांच्या संयुक्त पथकांकडून युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे.

नाले सफाई व जलनिचऱ्याची मोहीम

शहरातील सखल भागांमध्ये पावसाचे पाणी साचू नये आणि जलनिचरा सुरळीत व्हावा यासाठी नगरपरिषदेच्या स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग आणि अग्निशमन विभागाच्या संयुक्त पथकाने शहरातील विविध भागांची पाहणी केली. पाण्याच्या प्रवाहातील अडथळे दूर करत नाल्यांची तातडीने साफसफाई करण्यात आली असून जलनिचऱ्याची व्यवस्था सुरळीत करण्यावर भर देण्यात आला.

धाडी नदी परिसरात वाढवली गस्त

मुसळधार पावसामुळे धाडी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नदीकाठच्या परिसरात नियमित गस्त सुरू करण्यात आली आहे. नदीपात्र, पूल आणि वेगवान पाण्याच्या प्रवाहाजवळ नागरिकांनी जाऊ नये, तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

अतिवृष्टीच्या काळात कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी तत्काळ नगरपरिषद व संबंधित प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांच्या जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button