Crime

महामार्गावरील लूटप्रकरणी ‘वड्या’जेरबंद ! ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

धुळे तालुका पोलिसांची कारवाई

धुळे प्रतिनिधी I :- येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर एका हॉटेल जवळ वाहनात झोपलेल्या व्यक्तीला मारहाण करून त्याच्याकडून मोबाईल आणि रोकड लुटून पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 36 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,तेजस महेंद्र सोनवणे वय-22 रा. दापोरे जि. जळगांव हे नाशिक येथून बोलेरो गाडीने येत असताना डुलकी आल्याने त्यांनी बाळापूर ता.जि. धुळे शिवारातील हॉटेल कल्पेशजवळ गाडी उभी करुन गाडीत झोपले असतांना अनोळखी चोरट्याने येवून तक्रारदाराच्या गाडीचा दरवाजा उघडून त्यांना मारहाण करुन त्यांचा 36 हजार-रुपये किंमतीचा विवो कंपनीचा मोबाईल व 3 हजार रोख लुटून पळून गेला. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, यांनी गुन्हयाचे गांभीर्य लक्षांत घेवून  पोउनि  कृष्णा पाटील, पोहवा कुणाल पानपाटील, -उमेश पवार, – हर्षल धनगर, संदीप शिंदे  विशाल पाटील,-धिरज सांगळे,  रविंद्र सोनवणे यांचेसह तात्काळ घटनास्थळी धाव घेवून तक्रारदार कडून अनोळखी चोरटयाची माहिती जाणून घेतली.

पोलीस अधीक्षक, धुळे . श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक . किशोर काळे, उप-विभागीय पोलीस अधिकारी . संजय बंबाळे यांना घटनेची माहिती देवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे  फिरवून  वसिम ऊर्फ वडया सलिम रंगरेज वय-39 रा.शब्बीर नगर दो हजार बस्ती इकरा वॉटर प्लान्ट जवळ, 100 फुटी रोड धुळे याला ताब्यात घेतल्यावर त्याने कबुली देवून गुन्हयातील चोरीस गेलेला तक्रारदार यांचा विवो कंपनीचा मोबाईल आणि पाचशे रुपये काढून दिले.

पुढील तपास  कृष्णा पाटील, पोलीस उप-निरीक्षक,  करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button