Politics

शिवसेनेकडून नागरिकांसाठी  पाणपोई; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उपक्रम; शिवसैनिकांची मोठी उपस्थिती

शिवसेनेकडून नागरिकांसाठी  पाणपोई; मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

कडक उन्हाच्या पार्श्वभूमीवर जळगावातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात उपक्रम; शिवसैनिकांची मोठी उपस्थिती

जळगाव : राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जळगाव शहरातील पांडे चौक येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयासमोर उभारण्यात आलेल्या थंडगार पाणपोईचे लोकार्पण करण्यात आले. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिकांना दिलासा मिळावा या उद्देशाने शिवसेनेच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांतून तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामाजिक उपक्रम साकारण्यात आला. शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात थंड पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी शिवसेनेच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
यावेळी विधानसभा क्षेत्र प्रमुख श्यामभाऊ कोगटा, महानगर प्रमुख संतोषभाऊ पाटील, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख जितेंद्र गवळी, महानगर समन्वयक राहुल नेतलेकर, सोहम विसपुते, दिपक पाटील, विशाल निकम, दिपक माळी, शुभम गवळी, सचिन सोनार, राहुल सांगिले, चेतन परदेशी, क्रिश सनकत, विजय वाघ, शंतनू नारखेडे, यश कोल्हे, मानस तळले यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र गवळी मित्र परिवाराने विशेष परिश्रम घेतले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button