Crime

मुंबई – अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनवर गव्हाने भरलेला ट्रक आदळला !

मुंबई – अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनवर गव्हाने भरलेला ट्रक आदळला!

सुदैवानी जीवित हानी टळली

बोदवड ;– शुक्रवारी पहाटे ५ वाजता बोदवड रेल्वेस्थानकापासून ५०० मीटर अंतरावर एक गंभीर अपघात घडला. धान्याने भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक रेल्वे गेट तोडून मुंबई – अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनवर जाऊन धडकला. या अपघातात कुठलाही जिवितहानी झाली नाही. मात्र, एक्सप्रेस ट्रेनच्या इंजिनवर धडक लागल्याने सुदैवाने मोठा प्रकार टळला.

हे अपघात बोदवड रेल्वे गेटवर झालं, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस (क्रं. १२१११) सकाळी पाच वाजता त्या मार्गावरून जात होती. अचानक बंद असलेल्या गेट तोडून ट्रक रेल्वे मार्गावर घुसला आणि एक्सप्रेसच्या इंजिनवर धडकला. एक्सप्रेस चालकाने तात्काळ ब्रेक लावल्यामुळे मोठी दुर्घटना टळली, मात्र ट्रकचालक गाडीच्या धडकेनंतर उडी मारून पसार झाला. ट्रकच्या धडकेमुळे एक्सप्रेसमधील काही प्रवासी बर्थवरून खाली पडले.

अपघातामुळे रेल्वेच्या हाय टेन्शन वायरला मोठं नुकसान झालं आहे. यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अमरावती एक्सप्रेस घटनास्थळीच थांबविण्यात आली, आणि इतर गाड्या जसे की महाराष्ट्र एक्सप्रेस, भुसावळ – बडनेरा मेमू, शालिमार एक्सप्रेस आणि अप मार्गावरील चेन्नई-अहमदाबाद एक्सप्रेस, वर्धा-भुसावळ या गाड्यांचा वेळ उशीराने झाला आहे.

रेल्वे प्रशासनाने त्वरित कार्यवाही सुरू केली असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button