Crime

ब्रेकिंग : आव्हाणे रस्त्यावर शेतात तरुणाचा निर्घृण खून

महा पोलीस न्यूज | २० एप्रिल २०२४ | जळगाव शहरातील असोदा शिवारात तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा एका तरुणाची निर्घृणपणे हत्त्या करण्यात आल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. आव्हाणे रस्त्यावर असलेल्या लक्ष्मण पाटील उर्फ लकी टेलर यांच्या जिनिंग मागील शेतात हा खून झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आव्हाणे रस्त्यावर लक्ष्मण पाटील उर्फ लकी अण्णा यांच्या मालकीची लक्ष्मी जीनिंग आहे. जिनींगमध्ये ठेकेदारीत काम करणाऱ्या एका तरुणाचा शनिवारी पहाटेच्या सुमारास जिनींग मागील भरत खडके यांच्या मालकीच्या शेतात अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे दुपारच्या सुमारास उघडकीस आले. शेतात चारा कुट्टी पसरलेल्या प्लास्टिक फटवर डोक्यावर मागील बाजूस तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे.

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजनपाटील, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक महेश शर्मा, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे, श्पवान पथक, ठसे तज्ञ आणि कर्मचारी पोहचले आहेत. मयताचे नाव सुरेश परमसिंग सोलंकी वय – ४० रा.गेहिज खेमला, जि.सेंधावा, मध्यप्रदेश असे असून मृताजवळ काही वस्तू आढळून आल्या असून तपास सुरू आहे.

दरम्यान, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून परिसरातील सीसीटिव्ही कॅमेरा फुटेज, श्वान पथकाने दाखवलेला मार्ग आणि इतर पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button