Crime

म्हशींना चिरडणाऱ्या चालकविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

म्हशींना चिरडणाऱ्या चालकविरुद्ध अखेर गुन्हा दाखल

भडगाव प्रतिनिधी भडगाव ते वाक रस्त्यावर वाळूने भरलेल्या भरधाव डंपरने दिलेल्या धडकेत ३ म्हशीठार तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना ११ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली होती, अखेर नऊ दहा दिवसानंतर म्हशींना चिरडणाऱ्या डंपर चालका विरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी संबंधित चालक विरुद्ध गुन्हा दाखल करत फिर्यादी व संशयित आरोपी यांच्यात आपसात तडजोड झाल्या नंतर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो हे दाखवून दिले आहे.

यात पदाधिकारीस पायास व हातास गंभीर मार लागुन दुखापत झाली होती. या दोन गंभीर घटना घडल्या असताना देखील त्या चालक व मालक विरुद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता. दरम्यान पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या गैरहजेरीत हा प्रकार घडला होता.

ते पोलिस स्टेशनला हजर होताच त्यांनी दोन्ही घटनेचे गांभीर्य ओळखून उशिरा का असेना अखेर पो. काॅ. प्रविण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून योगेश गोकुळ पाटील रा.वाक ता. भडगाव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

म्हशींना शेतामध्ये चारण्यासाठी घेऊन जात असतांना भडगाव ते वाक दरम्यान जुना महिदंळे रस्त्याच्या कडीलगत असणाऱ्या विटभट्टीजवळ वाक गावाकडून भडगावकडे येणारा डंपर क्रमांक एम. एच. ४३ बीपी ७८४२ वरील चालक योगेश गोकुळ पाटील याने दिनांक ११ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास म्हशींना धडक दिली होती. या अपघातात तीन म्हशी ठार तर एक म्हैस गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती

पीएसआय सुशिल सोनवणे, पोहेका निलेश ब्राह्मणकर, मनोहर पाटील हे पेट्रोलीग करीत असताना आरोपीने ताब्यातील डंपर भरधाव वेगाने चालवित असताना मिळुन आल्याने गुरन १५/२०२५ प्रमाणे भारतीय न्याय संहिता २८१, मोटर व्हॅकल अॅक्ट १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे…

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button