CrimeEducation

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

भुसावळ येथे हर घर तिरंगा अभियानांतर्गत सायकल रॅली

भुसावळ : हर घर तिरंगा अभियानांतर्गत ताप्ती पब्लिक स्कूल, भुसावळ येथून भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीमध्ये ताप्ती पब्लिक स्कूलसह भुसावळ शहरातील इतर शाळांमधील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या सायकलींना तिरंगा ध्वज लावून देशभक्तीचा संदेश देत सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला. रॅलीदरम्यान विद्यार्थ्यांनी “भारत माता की जय”, “वंदे मातरम्” अशा घोषणा देत नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत केली.

या सायकल रॅलीचे उद्घाटन पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. कुलदीप ठाकरे व गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्राचार्या नीना कटलर, सायकलिंग असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे, पीएसआय असलम खान (भुसावळ वाहतूक शाखा), सहायक फौजदार संजय भदाणे, विज्ञान मंडळाचे अध्यक्ष सुनील वानखडे, प्रा. मनोज वारके यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी ताप्ती स्कूलचे क्रीडा शिक्षक विजय संकत यांच्यासह शाळेतील शिक्षक, शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.
या सायकल रॅलीच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाबद्दल आदर, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हे या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button