Crime

घर खाली करण्यास विरोध करत महिलेकडून आत्मदहनाची धमकी ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

घर खाली करण्यास विरोध करत महिलेकडून आत्मदहनाची धमकी ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव | प्रतिनिधी सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता विकास नारायण पाटील यांच्या जळगावातील मेहरूण परिसरातील घरात एका महिलेकडून अनधिकृतपणे अतिक्रमण केल्याचा प्रकार समोर आला आहे. घर रिकामे करण्यास गेलेल्या पाटील दांपत्याला संबंधित महिलेने शिवीगाळ करत अंगावर रॉकेल टाकून आत्मदहनाची धमकी दिली, अशी धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरवाजा फोडून बळकावले घर

विकास पाटील (वय ७०, रा. थत्ते नगर, कॉलेज रोड, नाशिक) हे बांधकाम विभागातून निवृत्त झाले असून त्यांचे मालकीचे घर गृहकुल हौसिंग सोसायटी, मेहरूण, जळगाव येथे आहे. या घरातील तीन खोल्यांच्या ब्लॉकमध्ये सुधा राजेंद्र महाजन (रा. जळगाव) या महिलेने दरवाजांचे नुकसान करून अनधिकृतपणे प्रवेश केला असून सध्या ती तिथे अतिक्रमण करून राहत आहे.

घर रिकामे करण्यासाठी ३ मे आणि २३ मे रोजी पाटील दांपत्य त्या ठिकाणी गेले असता, सुधा महाजन हिने त्यांना शिवीगाळ केली. इतकेच नव्हे तर, “मी स्वतःला पेटवून घेऊन तुमचे नाव सांगेन”, अशी धमकी देत तिच्या अंगावर रॉकेल टाकल्याची माहिती तक्रारीत नमूद आहे.

या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या विकास पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार गृह अतिक्रमणाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिस हेड कॉन्स्टेबल गणेश वंजारी यांच्याकडे पुढील तपास सोपवण्यात आला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button