बंद घराचे कुलूप तोडून चोरी करतांना सराईत,अट्टल चोरटा जेरबंद
दुसरा चोरटा पसार ; नागरिकांच्या सतर्कतेने भडगाव पोलिसांना यश

बंद घराचे कुलूप तोडून चोरी करतांना सराईत,अट्टल चोरटा जेरबंद
दुसरा चोरटा पसार नागरिकांच्या सतर्कतेने भडगाव पोलिसांना यश ;
भडगाव I प्रतिनिधी शहरातील बंद घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका अट्टल चोरटयास पकडण्यात नागरीकांच्या सहकार्यने भडगाव पोलिसाना यश आले आहे. आरोपी सराईत गुन्हेगार आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता त्यास सोमवार पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.
शहरातील भवानी बाग परीसरातील रामकृष्ण नगर रहिवाशी आत्माराम चिंधा पाटील हे आपल्या पत्नी सह मुली कडे बाहेर गावी गेले होते. आत्माराम पाटील यांचे घर बंद असल्याने प्रविण संभाजी पाटील (वय ३५) रा. बाम्हणे ता. एरंडोल, विभोर जुलाल जाधव रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल या दोघे चोरट्यांनी दिनांक १७ जानेवारी रोजी ३ वाजुन १० मिनिटानी बंद घराचे कुलूप तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी या घरा समोरील रहिवाशी संदीप भास्कर मराठे (मुगटीकर), यांच्या लक्षात हा प्रकार आला असता त्यांनी काॅलनीतील इतर रहिवाशी जागृत करून हा प्रकार सांगितला.
यावेळी झालेल्या आवाजाने चोरट्यांनी त्यांच्या ताब्यातील काळ्या रंगाची होन्डा शाहीन मोटार सायकल क्रमांक एम. एच. १९- डी.ए. ८३८६ घेऊन पेठ चौफुलीकडे पळ काढला. यावेळी संदीप भास्कर मराठे यांनी पेठ चौफुलीवर थांबलेले आपल्या काही मित्रांना व पोलीस स्टेशनला हा प्रकार सांगितला. यावेळी संदीप मराठे, हर्षल लालसिग पाटील, रात्री गस्तीवर असलेले पीएसआय कीशोर पाटील एएसआय चालक राजेंद्र पाटील यांनी या चोरट्यांचा पाठलाग करुन पेठ चौफुलीवर दोन चोरट्यां पैकी प्रविण संभाजी पाटील (वय ३५) रा. बाम्हणे ता. एरंडोल, यांस पकडण्यात यश आले
. तर दुसरा चोरटा विभोर जुलाल जाधव रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल हा पळवुन जाण्यात यशस्वी ठरला आहे. त्याचा शोध पोलिस घेत आहेत. प्रविण संभाजी पाटील (वय ३५) रा. बाम्हणे ता. एरंडोल, विभोर जुलाल जाधव रा. हिगोणे, जवखेडे या. एरंडोल यादोघे चोरट्या विरुद्ध पोलीस स्टेशनला भारतीय न्याय संहिता नुसार ३३१ (४), ३०५(अ), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रविण संभाजी पाटील (वय ३५) रा. बाम्हणे ता. एरंडोल या चोरट्यांस पाचोरा न्यायालयात हजर केले असता सोमवार पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून पुढील तपास पो. हे काँ. विजय जाधव हे करीत आहे.