Social

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे पोलीस अधिक्षकांच्या हस्ते अनावरण

महा पोलीस न्यूज । दि.२८ डिसेंबर २०२४ । महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेच्या दिनदर्शिकेचे अनावरण पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. पोलीस अधीक्षक यांच्या दालनात हा कार्यक्रम पार पडला.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख कुणाल मोरे यांनी प्रास्ताविकात दिनदर्शिकेची रचना, कल्पना व उपयुक्ततेवर प्रकाश टाकला. तसेच दिनदर्शिकेच्या माध्यमातून समाजाला संस्थेचा उद्देश पोहोचवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राकेश कांबळे, पत्रकार प्रतिनिधी चेतन वाणी, महानगराध्यक्ष किरण राजपूत, महिला अध्यक्ष तन्वी पांडव, उपसंपर्क प्रमुख अमित बच्छाव, उत्तर महाराष्ट्र जिल्हा संपर्क प्रमुख निवेदिता ताठे आदी उपस्थित होते. या उपक्रमामुळे समाजात पोलीस प्रशासनाबद्दल माहिती मिळेल आणि जनजागृती घडून येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची दिनदर्शिका संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आली असून सण, उत्सव, वार्षिक योजना, सांस्कृतिक महत्त्व, पोलीस प्रशासन यावर आधारित आहे. यामध्ये विशेषता सणांचे वर्णन, महत्त्वाच्या तारखा, प्रेरणादायी संदेश यांचा समावेश करण्यात आला आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button