Crime

अल्पवयीन मुलीला पळवणाऱ्या तरुणाला सुरतहून अटक

एमआयडीसी पोलिसांची कारवाई

जळगाव महा पोलीस न्यूज l १५ मे २०२५ तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेणाऱ्या वसीम निसार शहा (वय ३४, रा. तांबापुरा) याला एमआयडीसी पोलिसांनी सुरत येथून अटक केली आहे. त्याला जळगावात आणण्यात आले असून, त्याच्याविरोधात पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दि. ३ मे रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरातून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाली होती. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल केली होती. तपासादरम्यान पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना वसीम शहा यानेच मुलीला पळवून नेल्याची माहिती मिळाली.

पोलिस उपनिरीक्षक इम्रान बेग यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला. वसीम हा सुरुवातीला वापी येथे तर नंतर सुरत येथे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी सुरत येथे जाऊन वसीम आणि अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. बुधवार, दि. १४ मे रोजी दोघांना जळगावात आणण्यात आले.

या प्रकरणी वसीम शहा याच्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button