भडगावात कामदा एकादशीला भव्य दिव्य श्रीरामांचा रथ उत्सव
श्रीरामांच्या रथ उत्सववाला 350 वर्षांची परंपरा

भडगावात कामदा एकादशीला भव्य दिव्य श्रीरामांचा रथ उत्सव
श्रीरामांच्या रथ उत्सववाला 350 वर्षांची परंपरा
रथोत्सव नियोजन बैठक उत्साहात संपन्न
भडगाव – प्रतिनिधी
भडगाव शहराला 350 वर्षांची परंपरा असलेल्या प्रभू श्रीरामांचा रथोत्सव ८ एप्रिल (कामदा एकादशी) या दिवशी भव्य दिव्य असा रथ उत्सव निघणार आहे .याबाबत दि.२२ रोजी रात्री ८ वाजता श्रीराम मंदिर येथे नियोजन बैठक पार पडली. या बैठकीत प्रभू श्रीरामांचा रथ उत्सव चांगल्या उत्साहात निघणार असून पंचक्रोशीतील व जिल्हाभरातील श्रीराम भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. कामदा एकादशीच्या दिवशी निघणारा रथावर प्रभू श्रीराम, सीतामाता, लक्ष्मण भैया, यांच्यासह अर्जुन, भालदार-चोपदार, दोन घोडे, अहिरम-बहिरम, बजरंग बली, रथाच्या मागे दोन माकडे व सजवलेला रथ सवाद्य निघणार आहे.ही मिरवणूक दुपारी ४ वाजता भडगाव शहरातील रथ मार्गे निघणार आहे. सर्व भाविकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.