कुराण जगात सर्वात जास्त वाचला जाणारा ग्रंथ : प्रा.वाजेद अली खान

महा पोलीस न्यूज | ७ एप्रिल २०२४ | कुराण हार्दिक जगात सर्वात जास्त सातत्याने वाचला जाणारा ग्रंथ आहे. यात रोजाचे महत्व विषद केले असून अल्लाहच्या प्रति आभार व्यक्त करण्यासाठी रोजाचे महत्व आहे. सर्वात मोठा रोजा सव्वीसवा असून भारतात साडे तेरा तासांचा रोजा आहे. मुस्लिम बांधवांपैकी अद्याप ५ टक्के देखील बांधवांनी कुराण अभ्यासून आत्मसात केलेलं नाही. कुराण आत्मसात केल्यावर खऱ्या अर्थाने माणुसकीचा मार्ग सापडतो, असे प्रा.वाजीद अली म्हणाले.
रावेर शहरातील भाटखेडा रोडवरील अनिल दत्तू पाटील यांचे घरात जमाते इस्लामे हिंदकडून सामूहिक रोजा इफ्तार कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी प्रमुख व्याख्याते प्रा.वाजीद अली खान हे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी जमाते इस्लामी हिंदचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले. या ठिकाणी सर्वांनी सामूहिक रोजा इफ्तार केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सफी सर यांनी केले.
प्रा.वाजीद अली म्हणाले की, भारतीय भाषा मध्ये प्रकाशित आहेत. याचा सोबत त्यांनी रमजान महिन्यातील धार्मिक वातावरणामुळे न्याय, समता, धार्मिक सहिष्णुता वाढीस लागते. आपण सर्व एक आहोत ही भावना वृध्दींगत होण्यासाठी रोजा इफ्तार पार्टीला महत्त्व आहे. सामाजिक व जातीय सलोखा आणि एकात्मतेसाठी सर्व समाजातील लोकांनी एकत्र येणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.
कार्यक्रमास एनएसयुआयचे धनंजय चौधरी, माजी नगराध्यक्ष हरीश गणवानी, माऊली फौंडेशन अध्यक्ष डॉ.संदीप पाटील, पद्माकर महाजन, डॉ.दत्तू पाटील, आर.व्ही.पाटील, सलीम सर, संतोष पाटील, जेष्ठ पत्रकार दीपक नगरे, जगदीश घेटे, शे.सादिक, ग.सं.सोसायटी सभासद निलेश पाटील, शे.गयास, श्री.महाले, एस.सी.पाटील, अनिल पाटील, डॉ.मिलिंद वानखेडे, डॉ.योगेश महाजन,अनिल पाटील, डि.बी.पाटील, डॉ.कुश, डॉ.अभिषेक, डॉ.निखिल कुमार, डॉ.कृष्णा पाटील, संतोष महाजन, डॉ.वशीम शेख, शेख असलम, शेख रिजवान, लारेब खान, सैय्यद अययूब, सरफराज सर, कौशर आदी मान्यवर उपस्थित होते.