Other

जिल्हापेठ पोलीस निरीक्षकांची बदली, भडगाव निरीक्षकांना लवकरच पदोन्नती

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांना सुरुवात झाली आहे. प्रशासकीय कार्यकाळ पूर्ण केलेल्या २४९ निरीक्षकांच्या बदलीचे आदेश मंगळवारी जारी करण्यात आले. जळगाव जिल्ह्यातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची मुंबई शहर विभागात बदली करण्यात आली आहे. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी तपासणी समितीचे निरीक्षक सागर शिंपी यांची देखील जळगावात बदली करण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलीस दलात सध्या बदल्यांचे वारे सुरू असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या संपल्यानंतर आता त्या खालील अधिकाऱ्यांच्या बदल्या सुरू झाल्या आहेत. राज्यातील पोलीस निरीक्षकांच्या प्रशासकीय बदल्या मंगळवारी करण्यात आल्या. त्यात काहींना स्थगिती देण्यात आली तर काहींची जिल्ह्याबाहेर बदली करण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांची मुंबई शहर येथे बदली करण्यात आली आहे. तसेच जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी तपासणी समितीचे निरीक्षक सागर शिंपी यांची देखील जळगावात बदली करण्यात आली आहे. तसेच राज्यातील २१५ पोलीस निरीक्षकांची पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त (निशस्त्र) पदावर पदोन्नती होणार आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव पोलीस निरीक्षक पांडुरंग विठ्ठल पवार यांची देखील पदोन्नती होणार असल्याने तूर्तास त्यांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button