Other

नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या, वाचा कोण येणार, कोण जाणार

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । नाशिक परिक्षेत्रातील पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. विशेष पोलीस महानिरीक्षक, दत्तात्रय कराळे यांनी हे आदेश काढले आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न (२) अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांनी या बदल्यांना मान्यता दिली आहे.

या आदेशानुसार, नाशिक परिक्षेत्रातील विविध जिल्ह्यांतील पोलीस निरीक्षकांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या आहेत. बदल्या झालेल्या पोलीस निरीक्षकांची नावे आणि त्यांची बदली कुठून कुठे झाली याची माहिती खालीलप्रमाणे आहे.

पोलिसांच्या बदल्या खालीलप्रमाणे, नाव-सध्याची नेमणूक-नियुक्तीचे ठिकाण..
* हेमंतकुमार भामरे (नाशिक ग्रामीण > नंदुरबार)
* अरुण काशिनाथ धनवडे (नाशिक ग्रामीण > अहिल्यानगर)
* यशवंत भाऊराव बाविस्कर (अहिल्यानगर > नाशिक ग्रामीण)
* प्रदिप बाळासाहेब देशमुख (अहिल्यानगर > जळगाव)
* भगवान हरिभाऊ मथुरे (अहिल्यानगर > नाशिक ग्रामीण)
* समाधान चंद्रभान नागरे (अहिल्यानगर > नाशिक ग्रामीण)
* नागेश एन. मोहिते (जळगाव > नाशिक ग्रामीण)
* किरणकुमार दशरथ कबाडी (जळगाव > अहिल्यानगर)
* सारिका विठ्ठलराव अहिरराव (धुळे > नाशिक ग्रामीण)
* शशिकांत श्रीराम पाटील (धुळे > जळगाव)
* संदीप उत्तमराव पाटील (नंदुरबार > जळगाव)
* जगदीश छबुराव भांबळ (नंदुरबार > अहिल्यानगर)

बदली झालेल्या निरीक्षकांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. तसेच, बदली ठिकाणी वेळेत हजर न झाल्यास संबंधितांवर शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button