Social

नाथपंथी समाजाच्या कार्यासाठी शोभाताई शिंदे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

सामाजिक उपक्रमांतील योगदानाची दखल; मानपत्र, सन्मानचिन्ह, पदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरव

नाथपंथी समाजाच्या कार्यासाठी शोभाताई शिंदे यांना राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार

सामाजिक उपक्रमांतील योगदानाची दखल; मानपत्र, सन्मानचिन्ह, पदक व स्मृतिचिन्ह देऊन गौरव

अमळनेर, प्रतिनिधी : अमळनेर येथील नाथपंथी समाज उत्तर महाराष्ट्र महासंघाच्या अध्यक्षा शोभाताई रघुनाथ शिंदे यांना त्यांच्या सामाजिक कार्याची, समाजासाठी केलेल्या प्रयत्नांची आणि पारदर्शक कार्यपद्धतीची दखल घेत राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला.

नॅशनल ह्यूमन राईट अँटी करप्शन सोशल जस्टिस फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय पुरस्कार २०२६ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात राष्ट्रीय अध्यक्ष अशोक पवार, राज्य अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, प्रदेश अध्यक्षा भामरे मॅडम आणि प्रमोदिनी पाटील यांच्या हस्ते शोभाताई शिंदे यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी त्यांना मानपत्र, सन्मानचिन्ह, पदक आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आले. नाथपंथी समाजासाठी सातत्याने केलेले कार्य, सामाजिक प्रश्नांसाठी घेतलेला पुढाकार, समाजातील विविध घटकांशी असलेला संपर्क तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग या कार्याची दखल घेऊन त्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

शोभाताई शिंदे यांचा महिला वर्गाशी मोठ्या प्रमाणात संपर्क असून महिलांच्या विविध प्रश्नांबाबत त्या सातत्याने कार्यरत असतात. समाजातील महिला तसेच इतर घटकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे, सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेणे यामुळे त्यांचे कार्य समाजात विशेष ठरले आहे.

यापूर्वीही शोभाताई शिंदे यांना विविध स्तरांवर अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. कोरोना काळात केलेल्या सामाजिक कार्याबद्दल त्यांना कोरोना योद्धा म्हणून गौरविण्यात आले होते. तसेच मराठी लाइव्ह न्यूज चॅनेलच्या वतीनेही त्यांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे. याशिवाय समाजाच्या विविध उपक्रमांमध्ये केलेल्या योगदानाबद्दल त्यांचे अनेकदा सत्कार व सन्मान करण्यात आले आहेत.

सामाजिक कार्यात सातत्याने सक्रिय राहून समाजातील विविध घटकांना जोडण्याचे काम त्या करीत आहेत. त्यांच्या कार्याची राज्यस्तरावर दखल घेत समाजभूषण पुरस्काराने गौरव झाल्याने नाथपंथी समाजासह अमळनेर परिसरातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

शोभाताई शिंदे यांना मिळालेला हा सन्मान नाथपंथी समाजासाठी अभिमानाची बाब असून, त्यांच्या सामाजिक कार्याला या पुरस्कारामुळे आणखी प्रोत्साहन मिळाले आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button