Crime

विसरवाडीत चोरांचा धुमाकूळ: पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत मुख्य आरोपी ताब्यात; व्यापाऱ्यांचा मोकळा श्वास

विसरवाडीत चोरांचा धुमाकूळ: पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईत मुख्य आरोपी ताब्यात; व्यापाऱ्यांचा मोकळा श्वास
विसरवाडी (संजय वाणी): नवापूर तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या विसरवाडी गावात १६ ऑगस्ट २०२६ च्या रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत एकाच रात्रीत तब्बल ७ ते ८ दुकाने फोडली. यामुळे स्थानिक व्यापारी वर्गात घबराट पसरली होती. चोरट्यांनी हॉटेल, चहाचे दुकान, सलून, कटलरी दुकान, लाँड्री, बि-बियाणे व खतांचे दुकान तसेच एका दवाखान्याला लक्ष्य केले होते.

घटनेची माहिती मिळताच विसरवाडी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत वेगाने तपासाची चक्रे फिरवली. घटनास्थळावरील पुरावे, गुप्त बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक बाबींच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला.

पोलिसांच्या अथक प्रयत्नांमुळे अवघ्या दोन दिवसांत या गुन्ह्यातील मुख्य अल्पवयीन संशयित आरोपीला दोंडाईचा येथून ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांच्या या जलद आणि धडाकेबाज कारवाईमुळे व्यापारी वर्गाने मोकळा श्वास घेतला असून, विसरवाडी पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

ही यशस्वी कारवाई विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. जयेश खलाणे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल धीरेंद्र शिंदे, हेड कॉन्स्टेबल जगदीश पवार, विशाल बोरसे आणि लिनेश पाडवी यांच्या पथकाने केली.
या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, चोरीचा मुद्देमाल कुठे आहे, तसेच संशयिताकडून इतर काही गुन्हे उघडकीस येतात का, या दृष्टीने पोलीस पुढील तपास करत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल जगदीश पवार आणि पोलीस कॉन्स्टेबल विशाल बोरसे करत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button