यावल वन परिक्षेत्रातील अवैध दारुभट्ट्यांवर कारवाई

यावल (प्रतिनिधी ) ;- वनपरिक्षेत्र यावल पूर्व अंतर्गत नियतक्षेत्र बोरखेडा बुद्रुक, कक्ष क्र. 35 मध्ये महसुली हद्दीपासून असणाऱ्या चिचखोपा नाला व भवानी नाला परिसरामध्ये आज रोजी सकाळी वन विभागाने कारवाई करत 2 अवैध गावठी दारू भट्ट्यांसह 8 बॅरल गावठी दारूचे रसायन (1600 लिटर) किंमत 56000 व प्लास्टिक बॅरल जागेवरच नष्ट केले असून 4 लोखंडी बॅरल व अन्य लोखंडी साहित्य अंदाजे किंमत रु.2000 जप्त करण्यात आले.

कारवाईत वनरक्षक बोरखेडा बुद्रुक यांचेकडील प्रं.रि. क्र.08/2024 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे. कारवाई ही वनसंरक्षक (प्रा.), धुळे वनवृत्त निनु सोमराज उप वनसंरक्षक यावल वन विभाग जमीर शेख, विभागीय वन अधिकारी (दक्षता) धुळे राजेंद्र सदगिर , यांचे मार्गदर्शनाखाली मा.सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व कॅम्पा) यावल समाधान पाटील सर, वन परिक्षेत्र अधिकारी,यावल पूर्व श्री.स्वप्नील फटांगरे, यांचे नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाई दरम्यान वनपाल गस्ती पथक आर. एम. जाधव, आर. बी. थोरात तसेच वनरक्षक प्रकाश बारेला, नानसिंग बारेला, सुपडू सपकाळे, राजू बोंडल, बालाजी जोहरी, इंद्रकुमार लखवादे, मनीष बारेला, अनिल बारेला, कॉन्स्टेबल सचिन तडवी, वनसेवक अस्लम, शालम तसेच वाहन चालक आनंदा तेली, सचिन चव्हाण, अमोल पाटील, कर्मचारी उपस्थित होते. राज्य उत्पादन शुल्क भुसावळचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवने व जवान नंदू ननावरे यांचे कारवाईत सहभाग होता.






