भडगाव नगरपरिषदेसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर

भडगाव नगरपरिषदेसाठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर
भडगाव – प्रतिनिधी भडगाव नगरपरिषदे साठी प्रभाग निहाय आरक्षण सोडत येथील छत्रपती संभाजी महाराज सभागृह येथे दुपारी दोन वाजता जाहीर झाली. आहे.एकूण १२ प्रभागांसाठी २४ सदस्य निवडले जाणार आहे.एकूण २४ जागांपैकी १२ जागांवर महिला सदस्या असणार आहे.ही आरक्षण सोडत इयत्ता पहिली चे विद्यार्थी,तुषार वाल्मीक वाडेकर,कु.निशा देवेंद्र पाटील, कुमुदेश अमोल साळुंखे या लहान मुलांच्या हाताने चिठ्ठी काढत प्रांताधिकारी भूषण अहिरे,मुख्याधिकारी रवींद्र लांडे,यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली.
भडगाव नगरपरिषद सोडती नुसार प्रभाग निहाय आरक्षण पुढील प्रमाणे प्रभाग क्र.१अ) अनुसूचित जमाती महिला राखीव,ब) सर्वसाधारण,प्रभाग क्र.२ अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग ब)सर्वसाधारण महिला राखीव, प्रभाग क्र. ३ अ)सर्वसाधारण महिला राखीव ब)सर्वसाधारण प्रभाग क्र.४ अ)सर्वसाधारण महिला राखीव ब )सर्वसाधारण प्रभाग क्र.५ अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र.६ अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब)सर्वसाधारण, प्रभाग क्र.७ अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव ब)सर्वसाधारण प्रभाग क्र.८अ)सर्वसाधारण महिला राखीव ब)सर्वसाधारण प्रभाग क्र.९अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग ब)सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्र.१० अ)नागरिकांचा मागास प्रवर्ग ब)सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्र.११अ)अनुसूचित जाती राखीव ब) सर्वसाधारण महिला राखीव प्रभाग क्र.१२ अ)अनुसूचित जमाती ब)सर्वसाधारण महिला राखीव असे आरक्षण यावेळी जाहीर करण्यात आले. यावेळी भडगाव नगरपरिषद इच्छुकांची उमेदवारांची गर्दी होती.






