Crime
घोडदे येथून अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूलच्या ताब्यात

भडगाव प्रतिनिधी : भडगाव शहराजवळील घोडदे येथील गिरणा नदी पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर भडगाव महसूल विभागाने ताब्यात घेतले असून यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले यावेळी एक डंपर सुद्धा जप्त करण्यात आले आहे.
भडगाव तहसीलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली घोडदे येथून एक ट्रक्टर अवैध गौणखनिज वाहतूक करतांना पकडून तहसिल कार्यालयात जमा केले आहे. नायब तहसीलदार सुधीर सोनवणे ग्राम महसूल अधिकारी अविनाश जंजाळे,प्रविण पवार, संजय सोनवणे,गितेश महाजन,योगेश पाटील,लोकेश महाजन, ग्राम महसूल सेवक नितीन मोरे,समाधान माळी, लहू कोळी आदींच्या पथकाने कारवाई केली आहे.






