Gold-Silver Rate | सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या आजची स्थिती

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी | सराफ बाजारात सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतार कायम असून भंगाळे गोल्ड दालनाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार आज २२ कॅरेट सोन्याचा दर ₹१,१२,६७०, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ₹१,२३,००० इतका नोंदवण्यात आला आहे. चांदीचा दरही वाढत ₹१,५८,००० प्रति किलो झाला आहे.
सध्या लग्नसराईमुळे ग्राहकांकडून दागिन्यांच्या खरेदीत वाढ झाली असून प्रीमियम डिझाईन्स, हलक्या वजनाचे दागिने आणि लग्नातील पारंपरिक सेट्सना मोठी मागणी आहे. जळगाव आणि सावदा येथील भंगाळे गोल्ड दालनात नवीन कलेक्शनसाठी ग्राहकांची गर्दी कायम असल्याचे सराफ व्यावसायिकांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिरतेमुळे स्थानिक बाजारात मोठे बदल अपेक्षित नसले तरी डॉलर निर्देशांकातील हालचाल आणि जागतिक गुंतवणूक परिस्थितीनुसार पुढील दिवसांत सौम्य चढउतार होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
आजचे दर : (BHANGALE GOLD : JALGAON & SAVDA)
धातू कॅरेट आजचा दर
सोने 22K ₹१,११,७५० प्रति तोळा
सोने 24K ₹१,२२,००० प्रति तोळा
चांदी किलो ₹१,५५,५०० प्रति किलो
(Rates may change during the day)
भंगाळे गोल्डमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक स्कीम्स, विविध ऑफर्स आणि नवनवीन दागिन्यांच्या डिझाईन्सची रेलचेल आहे. शुद्धतेची खात्री, पारदर्शक व्यवहार आणि विश्वास या तीन कारणांमुळे ग्राहक भंगाळे गोल्डकडे मोठ्या प्रमाणावर आकर्षित होत आहेत.




