Crime

चोपड्यात गावठी कट्टा घेऊन येणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; एलसीबीची धडक कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

चोपड्यात गावठी कट्टा घेऊन येणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; एलसीबीची धडक कारवाई, ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

लासूर-चुंचाळे मार्गावर सापळा रचून तिघांना अटक; गावठी पिस्तूल, दोन मॅगझिन, मोबाईल व कार जप्त

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) चोपडा शहर पोलिसांच्या मदतीने बेकायदेशीर शस्त्रास्त्रांची वाहतूक करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीवर धडक कारवाई करत तीन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत एक गावठी कट्टा (पिस्तूल), दोन मॅगझिन, तीन मोबाईल फोन आणि एक कार असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला १ जुलै रोजी गुप्त माहिती मिळाली होती की, काही इसम एका कारमधून विनापरवाना गावठी कट्टा घेऊन लासूर-चुंचाळे मार्गे चोपडा शहराकडे येत आहेत. माहितीची खातरजमा करून एलसीबी आणि चोपडा शहर पोलिसांचे संयुक्त पथक तयार करण्यात आले.

पथकाने चोपडा-लासूर-चुंचाळे रस्त्यावरील शनिमंदिर परिसरात सापळा रचला. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास संशयित Hyundai EON (एमएच-२०-ईई-६१०३) कार अडवून पंचांसमक्ष झडती घेतली असता कारच्या मागील सीटखाली एक गावठी कट्टा, एक मॅगझिन आणि एक अतिरिक्त मॅगझिन आढळून आले. तसेच आरोपींकडून तीन मोबाईल फोनही जप्त करण्यात आले.

अटक करण्यात आलेले आरोपी : ज्ञानेश्वर रामकृष्ण माळी (वय ३९), रा. कुऱ्हाड खुर्द, ता. पाचोरा, जि. जळगाव, सचिन रोशन पवार (वय ३४), रा. मयूर पार्क कॉलनी, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर, अनिल कचरे साळुंखे (वय ३७), रा. जाधव गल्ली, गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर.

जप्त मुद्देमाल : ६० हजार रुपये किमतीचा गावठी कट्टा (पिस्तूल) व मॅगझिन, १० हजार रुपये किमतीचे अतिरिक्त मॅगझिन, ५ लाख रुपये किमतीची Hyundai EON कार, ३० हजार रुपये किमतीचे Oppo, Vivo आणि Redmi कंपनीचे तीन मोबाईल फोन, असा एकूण ६ लाख रुपयांचा मुद्देमाल.

याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २८५/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास चोपडा शहर पोलीस करीत आहेत.

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि चोपडा शहर पोलीस निरीक्षक पवन देसले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत एलसीबी आणि चोपडा शहर पोलिसांच्या पथकाने उत्कृष्ट समन्वय साधत उल्लेखनीय कामगिरी बजावली.

जळगाव पोलीस दलाने बेकायदेशीर शस्त्रास्त्रांविरोधात सुरू केलेल्या मोहिमेतील हे आणखी एक महत्त्वपूर्ण यश मानले जात असून, अशा अवैध कृत्यांविरुद्ध कठोर कारवाई यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button