साक्री तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार!
शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश; पश्चिम पट्ट्यात राजकीय हालचालींना वेग

साक्री तालुक्यात काँग्रेसला मोठे खिंडार!
शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गट शिवसेनेत प्रवेश; पश्चिम पट्ट्यात राजकीय हालचालींना वेग
धुळे प्रतिनिधी
साक्री तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. स्वयंसेवी संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य आणि शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला, यात महिलांचाही मोठा सहभाग होता.
हा पक्षप्रवेश सोहळा शिंदे गटाच्या आमदार सौ. मंजुळाताई गावीत आणि जिल्हा अध्यक्ष डॉ. तुळशीराम गावीत यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. या प्रसंगी वातावरणात “जय महाराष्ट्र”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला.
या भव्य पक्षप्रवेशाचा यशस्वी आयोजन विधानसभा प्रमुख संभाजी अहिरराव आणि तालुका प्रमुख अमोल सोनवणे यांच्या प्रयत्नातून झाले. या प्रवेशामुळे साक्री तालुक्यात शिवसेनेची ताकद आणखी मजबूत झाली असून, “आगामी निवडणुकांमध्ये झेंडा शिवसेनेचाच फडकेल”, अशी प्रतिक्रिया स्थानिक कार्यकर्त्यांतून व्यक्त करण्यात आली.
पक्षप्रवेशावेळी रेश्मा गायकवाड, बंटी चौरे, प्रतापराव गांगुर्डे, संदीप मुसळे, बाळा चौरे, महेश वाघ, अनिल सोनवणे, प्रेमचंद सोनवणे, अनिल गायकवाड, ललित चौरे, जावेद शेख, सुरेखा सूर्यवंशी, संजय ठाकरे आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला.
या पक्षप्रवेशामुळे साक्री तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून, काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली आहे.






