
दारव्हा पोलीस स्टेशनच्या पुढाकाराने नागरिकांना अल्प दरात वॉटर एटीएम उपलब्ध
पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सहभागातून राबविला उपक्रम
दारव्हl प्रतिनिधी
वाढत्या उन्ह्याच्या कडाक्यामुळे दारव्हा तालुक्यात व शहरात पाण्यासाठी नागरीकांची जिवाची लाहीलाही होल आहे. अशा वेळी दारव्हा पोलीस स्टेशनच्या आवारात कित्येक वर्षापासुन बंद पडलेल्या वॉटर ए.टी.एम.ची दुरुस्ती, पोलीस स्टेशनच्या परिसराची रंगरंगोटी दारव्हा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे आर्थिक सहभागातून करण्यात आली.
नागरीकांसाठी अवघ्या पाच रुपयात विस लिटर शुध्द व थंड पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याच बरोबर पोलीस स्टेशनचा परिसर स्वच्छ करून नागरीकांसाठी बसण्यासाठी ओटा, झाडांना रंगरंगोटी तसेच पर्यावरण संवर्धणासाठी पोलीस स्टेशनचे आवारातील प्रत्येक झाडाला संदेश देणारे फलक लावण्यात आले आहेत. यासोबतच नागरिकांना तत्पर सेवा पुरविण्यासाठी दारव्हा पोलीस स्टेशनचे अधिकारी व सर्व अंमलदार मेहनत घेत आहेत. यामुळे पोलीस स्टेशनचा परिसर अतिशय सुंदर, निसर्गरम्य व आल्हाददायक असा बनला आहे.
यामुळे दिवसभर पोलीस स्टेशन परिसरात पशु पक्षांची रेलचेल दिसुन येत आहे. पक्षाच्या कीलबीलाटाने पोलीस स्टेशनचा वातावरणात वेगळीच प्रसन्नता निर्माण झालेली आहे.
या वॉटर ए.टी.एम.चा छोटेखानी लोकार्पन सोहळा मा. पोलीस अधिक्षक श्री. कुमार चिंता साहेब, मा. अप्पर पोलीस अधिक्षक श्री. पियुष जगताप साहेब, यांचे मोलाचे मार्गदर्शनात आज दिनांक 25 फेब्रुवारी 2025 सकाळी मा. चिलुमुल्ला रजनीकांत सहाय्यक पोलीस अधिक्षक दारव्हा, यांचे हस्ते व मा. रवि काळे तहसिलदार दारव्हा, मा. राजीव शिंदे गटविकास अधिकारी दारव्हा, विलास कुलकर्णी पोलीस निरीक्षक दारव्हा, तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरीक, पत्रकार बांधव, पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे उपस्थितीत पार पडला.
यवतमाळ जिल्हा पोलीस दल व दारव्हा पोलीस स्टेशनच्या या उपक्रमाचे सर्व सामान्य नागरिकांनी स्वागत व कौतुक केले असुन कडक उन्ह्यामध्ये नागरीकासाठी अल्पदरात शुध्द व थंड पाणी उपलब्ध करुन दिल्याबद्दल नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.
Alhane