प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी

प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी साजरी
चोपडा : चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल, चोपडा येथे भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रेरणास्थान, राष्ट्रनायक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी अत्यंत आदरपूर्वक साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. रजीश बी. सर , उपमुख्याध्यापिका निखिला मॅम, सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन केले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्यलढ्यातील अमूल्य योगदान,तसेच शिक्षण, राष्ट्रप्रेम आणि सामाजिक जागृती यांबाबत त्यांनी केलेले कार्य याविषयी माहिती देण्यात आली. कार्यक्रमाचे नियोजन शाळेतील शिक्षकवृंदाने केले असून संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.







