Crime
उपचारासाठी दाखल अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

उपचारासाठी दाखल अनोळखी व्यक्तीचा मृत्यू
जळगाव: शहरातील टॉवर चौकातून एका सुमारे ५५ वर्षीय अनोळखी व्यक्तीस उपचारासाठी दि. २० रोजी रात्री ९.१५ वाजता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीअंती वैद्यकीय अधिकारी डॉ. निरंजन देशमुख यांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार ललित भदाणे करत आहेत.