पूर्णा नदीपात्रात बुलढाण्यातील चार डंपर पकडले!

पूर्णा नदीपात्रात बुलढाण्यातील चार डंपर पकडले!
मुक्ताईनगर तहसिलदारांची मोठी कारवाई!|
सुभाष धाडे | मुक्ताईनगर
तालुक्यातील कुऱ्हा -काकोडा परिसरातील पूर्णा नदीपात्रात दिवसाढवळ्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वर मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे यांनी मोठी कारवाई करत चार डंपर जप्त केल्याने वाळू माफियांमध्ये खळबळ उडाली आहे.
पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा करून ट्रॅक्टर आणि डंपर च्या माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यात वाहतूक केली जात असल्याची माहिती तहसीलदार गिरीश वखारे यांना मिळाली. बुधवारी (दि. २९) सकाळीच त्यांनी म्हसुलचे एक पथक शहानिशा करण्यासाठी पाठवले असता कुऱ्हा मलकापूर रस्त्यावर धुपेश्वर जवळील पुलाच्या काही अंतरावरच पिंप्राळा शिवारात वाळू उपसा व वाहतूक सुरू असल्याचे निदर्शनास आले. तहसीलदार वखारे यांच्या पथकाने थेट पिंप्राळा शिवार गाठले. महसूलचे पथक दिसताच वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर वरील चालक जागीच डंपर सोडून पळून गेले. पथकाने चार डंपर ताब्यात घेतले.सदर डंपर मलकापूर तालुक्यातील असल्याचे समजते. यावेळी वाळू तस्कर आणि बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. पोकॉ सागर सावे, अंकुश बावस्कर, सुनील मोरे, मंगेश सुरळकर यांनी गर्दी नियंत्रणात आणली. वाळूमाफिया हादरले तहसीलदार गिरीश वखारे यांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे वाळू माफिया चांगलेच हादरले आहेत. अशी कारवाई सतत करणार असून वाळू माफियांना वाहतुकीसाठी शेतातून रस्ता देणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर बोजा टाकणार आहे आणि ज्या जमिनीवर आधीच बोजा आहे त्या जमिनी सरकारजमा करण्याचा इशारा तहसीलदार वखारे यांनी दिला आहे. चौकट वाळू साठ्यांवर कारवाईची अपेक्षा महसूल विभागाने केलेल्या कारवाईचे जनतेतून स्वागत होत असून कुऱ्हा, थेरोळा, रिगाव, पिंप्राळा, को-हाळा, बोदवड, काकोडा गावांमधील अनधिकृत वाळू साठ्यांवर तसेच रात्रीच्या वेळी होणाऱ्या वाळू तस्करीवर कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. चौकट थेरोळा शिवारात वाळूमाफियांची दादागिरी वाढली थेरोळा शिवारात रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळू तस्करी होत असल्याने शेतरस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. ट्रॅक्टर व डंपर चालक बहुतांश अल्पवयीन असतात आणि नशेत असतात त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर वाहन घालण्या पर्यंत त्यांची मजल जाते






