Crime

यावल तालुक्यात बिबट्याची दहशत! शेतकरी भयभीत, तत्काळ कारवाईची मागणी

यावल तालुक्यात बिबट्याची दहशत! शेतकरी भयभीत, तत्काळ कारवाईची मागणी

यावल प्रतिनिधी तालुका: सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या दहिगाव, जामुनझिरा, सावखेडासिम आणि मोहराळा शिवारात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नुकताच २३ मार्च रोजी रात्री ७ वाजता दहिगावजवळ बिबट्या आढळून आला,

शेतात सध्या मका, भुईमूग आणि कांदा काढणीची कामे सुरू आहेत, मात्र बिबट्याच्या भीतीने मजूर शेतात जाण्यास घाबरत आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घालून शेतीकामे करावी लागत आहेत.
मोहराळा आणि जामुनझिरा परिसरातही बिबट्याचा वावर!

२२ मार्च रोजी मोहराळा स्मशानभूमी लगत बिबट्या दिसला होता. तसेच, जामुनझिरा शिवारातील नदीकिनारी आणि पंकज महाजन यांच्या शेताजवळ देखील त्याच्या हालचाली आढळल्या आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button