नसरापूरच्या आरोपीला मृत्यूदंड देण्याची ब्राह्मण समाज संघर्ष समितीची मागणी

भडगाव (प्रतिनिधी) : नसरापूर भोर येथे झालेल्या तीन वर्षीय बालिकेवर बलात्कार व खून प्रकरणी कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी मृत्युदंडाची शिक्षा होण्यासाठी भडगाव येथे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समीती च्या वतीने निवेदन देण्यात आले त्या निवेदनात असे म्हटलं आहे की वरील आपणास कळकळीची विनंती की नसरापूर भोर येथे महाराष्ट्र दिनी पहिल्या दोनबलात्कार प्रकरणातील गुन्हेगार भिमाजी कांबळे याने अवघ्या तीन वर्षाच्या वेदवती कुलकर्णी या चिमुकली वर बलात्कार करून क्रूर हत्या केली व मृतदेह शेणात लपवला हे सगळं त्याने स्वतः मृतदेह लपवलंयचेठिकाण दाखवून दिले असताना त्याला मृत्यूदंड द्यायचा सोडून आंदोलन करणारावर लाठीचार्ज केला हेअतिशय चुकीचे आहे. मुख्यमंत्री महोदय आपल्या कडे गृह विभाग असताना देखील हा अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहावा लागतोय हे दुर्दैव आहे. वेदवती सारख्या पुन्हा घटना घडू नये असे वाटतं असल्यास तातडीने निकाल लागेपर्यंत कोर्ट चालू ठेवून ही केस निकाली काढावी आणि आठ दिवसाच्या आत भीमा कांबळे यालामृत्यूदंड द्यावा व न्याय द्यावा जर हा न्याय लांबला तर तो न्याय म्हणता येणार नाही याची नोंद घ्यावी व वेदवतीला न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा अन्यथा तीव्र आंदोलन अवघ्या महाराष्ट्रात उभारू याची नोंद घ्यावी असा इशारा यावेळी देण्यात आला. या निवेदन वर अध्यक्ष बाळकृष्ण टोनगावकर, विजय देशपांडे, रवी कुलकर्णी, उदय देशमुख, योगेश दीक्षित बापू व्यवहारे, शशी निशाणदार, संजय जोशी अन्य व महिला सह्या आहेत.







