बहुभाषिक ब्राह्मण संघ परशुराम जन्मोत्सव तयारी सुरू

बहुभाषिक ब्राह्मण संघ परशुराम जन्मोत्सव तयारी सुरू
तिन दिवसांचे भरगच्च कार्यक्रम
जळगाव : . महाराष्ट्रात ब्राम्हण ऐकतेच्या चळवळीला आपल्या जळगाव शहरातून सुरू झालेल्या नेत्रदीपक भव्य दिव्य अशा भगवान परशुराम जन्मोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून ४०० कार्यकर्त्यांच्या परिश्रमातुन साकारली जाणार आहे.
जिल्हाभरात देखील परशुराम जन्मोत्सव साजरे व्हावे म्हणुन यंदा ९ तालुक्यांना भगवान परशुरामांच्या कायम स्वरुपी मुर्ती देण्यात येऊन तेथे देखील भव्य शोभायात्रेतचे आयोजन होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष श्रीकांत खटोड यांनी दिली. बहुभाषिक ब्राह्मण संघाच्या वतीने कन्हैया कुंज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी विद्यमान अध्यक्ष प्रतिथयश वास्तू विशारद नितीन पारगावकर, सचिव राजेश नाईक, पंकज पवनीकर व महिला संघाच्या अध्यक्षा वृंदा भालेराव, शरद पांडे व मनीष पात्रीकर उपस्थित होते.
यंदा जन्मोत्सवात सोमवार, दिनांक २७ एप्रिल रोजी सकाळी ८ वा. स्व बलदेव उपाध्याय फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर, स. ११ वा. सर्व तालुक्यांना भगवान परशुराम मूर्ती वितरण, सायं. ५ वा महाबळ चौकातुन विराट मोटर सायकल रॅली तसेच सायं. ७ वा. परशुराम दूत व देणगीदाते गौरवचे आयोजन देखील पोलिस मल्टी पर्पज हॉल याठिकाणी करण्यात आले आहे.
मंगळवार, दिनांक २९ एप्रिल रोजी दुपारी राम मंदिरात पुजन होऊन दुपारी ४.३० वाजता भव्य दिव्य शोभायात्रा निघणार आहे. या शोभायात्रेत समस्त ब्राह्मण समाज बंधु भगिनी सहभागी होणार आहे.
आयोजन करण्यात आले असून यंदाचे हे १६ वे असल्याने सर्व सभासद व कार्कर्त्यांचा उत्साह अतिशय जोरात असून सर्व जण जोरात कामाला लागल्याचेही सर्वांनी याठिकाणी नमूद केले.
दिनाक ४ मे रोजी भगवान परशुराम जन्मोत्सव व जगदगुरु आदी शंकराचार्य जयंती निमित्त सुशील देवधर यांचे व्याख्यानाचे देखील छत्रपती संभाजी महाराज नाट्यगृहात आयोजित करण्यात आले असल्याने जास्तीत जास्त श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे देखील आवाहन यावेळी करण्यात आले.