Social

हर्षल सावकारे यांचा शिक्षण व क्रीडा विभागा कडून सत्कार

हर्षल सावकारे यांचा शिक्षण व क्रीडा विभागा कडून सत्कार

भुसावळ l महा  पोलीस न्यूज l१६ मे २०२५ l

भुसावळ येथील एन के नारखेड विद्यालयातील हर्षल मनोज सावकारे याने रोलर रिले स्केटिंग राज्य स्पर्धेत घवघवीत यश संपादन करून संभाजीनगर येथे झालेल्या रोलर रिले स्केटिंग चॅम्पियनशिप मध्ये राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राच्या संघात भुसावळ शहराचे प्रतिनिधीत्व केले. त्या स्पर्धेत त्यांने उत्तम कामगिरी करून संघाला यश प्राप्त करून दिले सदर संभाजीनगर येथे झालेल्या43व्या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सुवर्णपदक प्राप्त केले.

त्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल थायलंड पटियाला येथे होणाऱ्या 7व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली.

त्याबद्दल भुसावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे ,महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष भुसावळ तालुका समन्वयक प्रदीप साखरे निलेश पाटील, प्रमोद गांधेले, सचिन पाटील, देवानंद वाघधरे, मनोज सावकारे, आदींनी त्याचे बुके देऊन अभिनंदन व स्वागत केले व पुढील एशियन स्पर्धेत विजयासाठी शुभेच्छा दिल्या .त्यास त्याचे स्केटिंग प्रशिक्षक पियुष दाभाडे व दीपेश सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन व कौतुक होत आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button