Crime
पिंपळगांव येथील गिरणा पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुलच्या ताब्यात

पिंपळगांव येथील गिरणा पात्रातून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसुलच्या ताब्यात
भडगाव प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील पिंपळगांव येथील गिरणा नदी पात्रातून दिवस रात्र बेसुमार अवैध वाळू वाहतूक चालू आहे. यावर भडगाव महसूल विभागाच्या पथकाने कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. हि कारवाई तहसिलदार शितल सोलाट यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील- ग्राम महसूल अधिकारी
संजय सोनवणे, प्रशांत कुंभारे, समाधान हुल्लुळे, गीतेश महाजन, विवेक महाजन, महादू कोळी महसूल सहाय्यक, समाधान माळी यांनी केली असुन भडगाव येथील शासकीय आयटीआय येथे जमा करण्यात आले आहे.