Crime

जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचा नाशिक विभागात डंका!

मुख्यमंत्र्यांच्य कृती कार्यक्रमात प्रथम क्रमांक; संदीप पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याचा नाशिक विभागात डंका!
मुख्यमंत्र्यांच्य कृती कार्यक्रमात प्रथम क्रमांक; संदीप पाटील यांच्यावर कौतुकाचा वर्षाव

जळगाव l महा पोलीस न्यूज l  दि. १८ मे २०२५ l मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवसांच्या सुधारणा कृती कार्यक्रमांतर्गत नाशिक विभागात जळगावच्या एमआयडीसी पोलीस ठाण्याने अव्वल कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सातत्यपूर्ण आढाव्यामुळे जळगाव पोलीस दलाने या योजनेत उत्कृष्ट कामगिरी केली. एमआयडीसी पोलीस ठाण्याने कार्यालयीन सुधारणा, स्वच्छता, तक्रार निवारण, नागरिकांचे सुलभ जीवनमान आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याबाबत उल्लेखनीय काम केले.

या यशस्वी कामगिरीमुळे नाशिक विभागात उपविभागीय स्तरावर एमआयडीसी पोलीस ठाणे अव्वल ठरले. दुसरा क्रमांक अहिल्यानगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याने, तर तिसरा क्रमांक धुळे जिल्ह्यातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याने मिळवला.

पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले, “आम्ही १००% वेळेत पासपोर्ट सेवा आणि चारित्र्य पडताळणी सेवा प्रदान केली. स्वच्छता मोहीम, जुन्या मुद्देमालाची विल्हेवाट, रेकॉर्ड अद्ययावत करणे आणि जुने रेकॉर्ड नष्ट करणे यासह कर्मचारी व अधिकाऱ्यांचे नियमित प्रशिक्षण घेतले.

याशिवाय, ‘एक सत्र विद्यार्थ्यांसाठी’ आणि ‘एकता होळी’ सारखे सामाजिक उपक्रम राबवले. सर्वोत्कृष्ट अंमलदारांचा सन्मान करून प्रोत्साहन दिले. स्वच्छ आणि सुंदर पोलीस ठाण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाने आणि सहकाऱ्यांच्या सहकार्याने आम्ही सातत्याने प्रगती केली. या सर्वांचा परिणाम म्हणून आज आम्हाला हा बहुमान मिळाला,” असे संदीप पाटील यांनी  सांगितले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button