Crime

भडगाव येथे बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनाच्या अपघातात शेतकरी बचावला !

वाहनचालकावर कारवाई करण्याची मागणी

भडगाव येथे बेदरकारपणे वाहन चालविणाऱ्या वाहनाच्या अपघातात शेतकरी बचावला !

वाहनचालकावर कारवाई करण्याची मागणी
भडगाव प्रतिनिधि

शहरातील लक्ष्मीनगरातील रहिवाशी शेतकरी कर्तारसिंग मच्छिंद्र परदेशी हे शेतातुन घराकडे येत असतांना या सिंलेंडर वाहतुक करणाऱ्या चालकाने रस्त्यावर अंदाधुंद गाडी चालवुन रस्त्यावर नियमानुसार व कमी वेगात चालणाऱ्या कर्तारसिंग परदेशी हे बाल बाल बचावल्याची घटना घडली आहे. माञ पोलीस स्टेशनची या घटनेची वार्ता देऊनही हा गाडीचालक भडगाव बसस्थानक परीसर, कजगाव, चाळीसगावच्या दिशेने रवाना झाला .

या घटनेतुन मी बाल बाल बचावलेलो आहे. अजुन काही जणांचा अपघातात मृत्युला कवटाळण्याची वेळ होती. माञ मी सतर्कतेनुसार कसा वाचलो हेच मला कळत नाही. परंतु माझ्यासह अजुनही काही जणांचे जीव गेले असते. तरी पोलीसांनी शहरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासुन संबंधित अंदाधुंद वाहन चालकावर कायदेशीर कार्यवाही करावी. अशी मागणी कर्तारसिंग मच्छिंद्र परदेशी यांनी दै. महा पोलिस न्युज कडे कैफीयत मांडली .

याबाबत माहिती अशी कि, भडगाव शहरातील लक्ष्मीनगरातील रहिवाशी शेतकरी यांचे शेत भडगाव पाचोरा रस्त्यावर क्रिडासंकुलासमोर आहे. ते आपल्या सालदारांसह शेती कामे करुन भडगावकडे परत जात असतांना मास्टरलाईन आईल कंपनीसमोरुन याच भागात रस्त्यावरुन करतारसिंग मच्छिंद्र परदेशी सायंकाळी ५ वाजे दरम्यान पाचोरा रोड वरील शेताकडून भडगावच्या दिशेने निघालो असता मास्टर लाईन ऑइल समोर चालत असताना मागुन येणाऱ्या गॅस सिलेंडरची गाडी यावरून चालकाने आम्हाला उडवण्याचा प्रयत्न केला . वेळीच गाडीच्या साईड मिरर मध्ये लक्ष गेल्याने या अपघातातुन मी बाल बाल बाचवलो. हा प्रसंग कोणासोबत घडू नये. यासाठी मी गाडी बाबतचा नंबर व त्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला संपर्क करून त्यांना भ्रमणध्वनीद्वारे दिली.

शहरात ठिक ठिकाणी सी सी टीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. तरी भडगाव पोलीसांनी या मगरुर अन अंदाधुंद स्थितीत वाहन चालवुन जीव घेण्याचा प्रयत्न करणार्या चालकाचा शोध घ्यावा. रीतसर कार्यवाही करावी. जेणेकरुन रस्त्यावर शिस्तीत वापरणार्या वाहनधारक व नागरीकांच्या जीवघेणा घटना घडणार नाहीत. अशी आमची मागणी आहे अशी माहीती दै. महा पोलिस न्युज शी बोलतांना कर्तारसिंग परदेशी यांनी दिली. कर्तारसिंग परदेशी हे वाडे येथील रहिवाशी आहेत तर भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेश परदेशी यांचे शालक आहेत

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button