जलसमृद्धीसाठी आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलनाचा इशारा

जलसमृद्धीसाठी आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलनाचा इशारा
भडगाव : खेडगाव खुर्द येथील नदी, जलसाठे, पाणी व्यवस्थेशी व प्रवासा संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी जलसमृद्धीसाठी आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समाजसेवक तथा जलदूत विजयकुमार सोनवणे यांनी दिली.
समाजहिताच्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. मात्र, अद्याप ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप सोनवणे यांनी केला आहे.
त्यामुळे दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११ वाजता खेडगाव खुर्द येथे आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गावातील मध्यभागातून वाहणाऱ्या नदीत जलसमाधी आंदोलन करण्यावर सोनवणे ठाम असल्याचे सांगण्यात आले.
प्रशासनाने तातडीने जनहिताच्या मागण्यांची दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.







