Crime
ट्रक विक्री प्रकरणी जळगावच्या तरुणाची साडेअकरा लाखात फसवणूक ; धुळ्याच्या दोघांविरुद्ध गुन्हा

जळगावः:- धुळे येथे राहणाऱ्या दोघांनी ट्रक विक्रीचा करारनामा करून व्यवहार पूर्ण न करता जळगावच्या एकाची साडेअकरा लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निशांत विजय पटाईत (वय-३५) रा. देवराम नगर, जळगाव यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक (एमएच ०४ जीसी ०८५९) विक्रीसाठी संशयित आरोपी भगवान उर्फ वाल्मीक भिवसन चौधरी आणि दगडू बंडू पाटील दोन्ही रा. धुळे यांनी निशांत पटाईत यांच्याकडून १४ ऑक्टोबर रोजी नोटरी करारनामा करून ट्रक ताब्यात घेतला. मात्र ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे अकरा लाख पन्नास हजार न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच निशांत पटाईत यांनी रामानंद नगर पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदिप बोरूडे हे करीत आहे.