Crime

पुसदमध्ये अवैद्य गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

पुसदमध्ये अवैद्य गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद

पुसद जि. यवतमाळ ;- पुसद न्यायालय परिसरात गावठी कट्टा बाळगून फिरणाऱ्या एका तरुणास उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या पथकाने दिनांक १४ एप्रिल २०२५ रोजी अटक करत अवैद्य शस्त्र जप्त केले. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव शेख सलीम शेख ईस्माईल (वय २१, रा. तुकाराम बापू वार्ड, पुसद) असे असून, तो पुसद येथील विभागीय न्यायालयाच्या डाव्या गेटसमोर स्व. अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ संशयास्पदरीत्या फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

पोलिसांनी तत्काळ सापळा रचत आरोपीस ताब्यात घेतले आणि झडती दरम्यान त्याच्या पॅन्टमध्ये १ गावठी कट्टा (काळा व सिल्व्हर रंगाचा) व २ जिवंत काडतूस सापडले. जप्त शस्त्र व काडतूसांची अंदाजे किंमत २७,०००/- रुपये इतकी आहे.शेख सलीम याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पुसद शहर येथे भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३/२५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, पुसद यांच्या पथकातील पोलीस अंमलदार पराग गिरनाळे, नरेश नरवाडे, पो.ह.वा. अभिजीत सांगळे व उमेश राठोड यांनी केली.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button