गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षातर्फे २५ जणांची मोतीबिंदू शस्त्रक्रीया

जळगावः येथील गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षातर्फे जामनेर तालुक्यातील २५ ज्येष्ठ नागरिकांवर मोतीबिंदूच्या यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यांना रविवारी रुग्णालवातून डिस्चार्ज देण्यात आला.
आ. गिरीश महाजन यांनी तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा निर्धार केला आहे. त्या अंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील नेत्रशल्य चिकित्सा विभागात जामनेर तालुक्यातील २५ ज्येष्ठ नागरिकांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आली. रविवारी त्यांना रुग्णालयातून निरोप देण्यात आला. या वेळेला एसटी महामंडळाची बस त्यांना घरी जाण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली होती.
शस्त्रक्रिया डॉ. प्रवीण पाटील, डॉ. विवेक सोळंकी, डॉ. विलास बाविस्कर, डॉ. वैभवी पांडे, डॉ. रेवती महाजन, भारती वाणी, अनंत लांडगे, यांनी
केल्या. गिरीश महाजन वैद्यकीय सहायता कक्षाचे आरोग्यदूत पैलवान शिवाजी पाटील तुषार चौधरी पवन कासार आदी उपस्थित होते.