Crime

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांच्या अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; मोबाईल दुचाकीसह मुद्देमाल हस्तगत

जबरी चोरीच्या गुन्ह्यातील संशयितांच्या अवघ्या २४ तासांत मुसक्या आवळल्या

यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ; मोबाईल दुचाकीसह मुद्देमाल हस्तगत

यवतमाळ I प्रतिनिधी I

अवधूतवाडी पोलीस ठाण्यात जबरी चोरीच्या गुन्हयातील संशयित विधी संघर्ष विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्यासह तिघांनां स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्याकडून चोरीचे १० मोबाईल आणि एक दुचाकी असा एकूण २, लाख ५१ हजारांचा मुद्देमाल हसगत करण्यात आला . त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सर्व प्रकारचे अवैध धंदे. अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई तसेच अउघड गुन्ह्यांतील आरोपीतांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याकरीता पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांना आदेशीत केले होते त्या अनुषंगाने एलसीबीचे पोलीस निरीक्षक सतिश चवरे यांनी पथकांना गोपनीय माहिती काढून गुन्हे उघड करण्याच्या दृष्टीने सुचना दिल्या .

२१ जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक यवतमाळ शहर व अवधुतवाडी परिसरात आरोपी शोध व पेट्रालींग करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडून खात्रीशिर माहिती मिळाली की, आठवडी बाजारा परिसरात जबरी चोरीच्या गुन्ह्यातील मोबाईल आपले सोबत बाळगून फिरत असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाल्यावरुन पथकाने शिवम ऊर्फ लाड्या कैलास चलपेलवार वय १९ वर्ष रा. सुराणा , आशिष ऊर्फ भुषण संतोष चचाणे वय १९ वर्ष रा. नवप्रभात चौक, माळीपुरा, यवतमाळ ,दर्शन हरीलाल बकोरीया वय २० वर्ष रा. सुरणा ले-आऊट, यवतमाळ तसेच १ विधीसंघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेऊन त्यांचे अंग झडतीत १० मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली सुझुकी कंपनीचे मोपेड वाहन असा एकूण २, लाख ५१ हजारांचा  मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कारवाई करणेकरीता पो.स्टे. अवधुतवाडी यांचे ताब्यात देण्यात आले.

हि कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंथा अपर पोलीस अधीक्षक, पियुष जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने , पोलीस निरीक्षक, सतिश चवरे सा, यांच्या मार्गदर्शनात सपोनि सुगत पुंडगे, पोलीस उपनिरीक्षक गजानन राजमल्लु,सफौ योगेश गटलेवार, सफौ साजिद, अजय डोळे, रुपेश पाली, योगेश डगवार, विनोद राठोड, रितुराज मेडवे, सलमान शेख, आकाश सहारे, देवेंद्र होले, आकाश सुर्यवंशी, यांनी केली ,

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button