Crime

सिंधी कॉलनीतील मोटारसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा, दोघे जेरबंद !

२४ तासांत चोरी उघडकीस: एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

सिंधी कॉलनीतील मोटारसायकल चोरी प्रकरणाचा उलगडा, दोघे जेरबंद !

२४ तासांत चोरी उघडकीस: एमआयडीसी पोलिसांची कामगिरी

जळगाव (प्रतिनिधी): – शहरातील मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असताना एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या २४ तासांत दोन मोटारसायकल चोरांना गजाआड करून मोठी कामगिरी बजावली आहे.

दिनांक ३० मार्च २०२५ रोजी रात्री ८ वाजता यश मनोहरलाल अहुजा (वय २४, रा. केमिस्ट भवन, जळगाव) यांनी सिंधी कॉलनी सेवामंडळ मंदिराजवळ आपली सीबी झेड मोटारसायकल (क्रमांक MH 19 BA 1737) पार्क करून मंदिरात प्रवेश केला. मात्र रात्री ९ वाजता परत आल्यानंतर गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दुसऱ्या दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी गुन्हा क्र. 248/2025, BNS कलम 303(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या वाढत्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी आणि अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक कार्यरत करण्यात आले. पोलीस निरीक्षक संदीप पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी तपासाच्या सूचना दिल्या.

गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून दोन संशयित इसमांची ओळख पटवली. तपासाच्या अनुषंगाने शनीपेठ पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संजय मराठे यास अटक करण्यात आली. चौकशीत त्याने माधव श्रावण बोराडे याचे नाव उघड केले. दोघांना अटक करून त्यांच्याकडून चोरी गेलेल्या दोन मोटारसायकली – CBZ (किंमत ₹80,000) व HF Deluxe (किंमत ₹60,000) असा एकूण ₹1,40,000 किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button