Other

भडगावात टँकरद्वारे ५०० झाडांना जीवदान

तालुक्यात ओढावलेल्या तापमानवाढीच्या संकटात वृक्षमित्र समूहाने राबवला उपक्रम

भडगावात टँकरद्वारे ५०० झाडांना जीवदान

तालुक्यात ओढावलेल्या तापमानवाढीच्या संकटात वृक्षमित्र समूहाने राबवला उपक्रम

प्रतिनिधी | भडगाव निसर्ग आणि मानवाचे नाते आदिम काळापासून दृढ राहिले आहे. मात्र, सध्या होत असलेल्या बेसुमार वृक्षतोडीमुळे केवळ वा भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावर तापमानवाढीचा भडका उडाला असून न नवनवे उच्चांक प्रस्थापित होत आहेत. दूर अशा प्रचंड उन्हात आणि पाण्याच्या नी टंचाईमुळे अनेक ठिकाणी वृक्ष सुकू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, भडगाव येथील ‘वृक्षमित्र समूहा’ने पुढाकार घेत या वृक्षांना पाणी देऊन जीवदान देण्याचे स्तुत्य ड. अभियान हाती घेतले आहे. गेल्या तीन वर्षांत या समूहाच्या वा माध्यमातून शहरात व परिसरात सुमारे ५०० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. प केवळ सोशल मीडियावर वृक्षारोपणाचे चे संदेश न पसरवता, प्रत्यक्ष जमिनीवर उतरून त्यांचे संवर्धन केले पाहिजे, या जाणीवेतून हे कार्यकर्ते अहोरात्र झटत आहेत. त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल घेत समाजातील विविध स्तरांतील दात्यांनीही या निसर्गकार्याला आर्थिक पाठबळ दिले आहे.

नुकत्याच सुरू केलेल्या ‘वृक्षसेवा’ अभियानांतर्गत समूहाचे सदस्य टँकरद्वारे प्रत्येक झाडाला पाणी घालत आहेत. विशेष म्हणजे, या कार्यात तरुणांसोबतच गिरणा नदीकाठावर संध्याकाळी फिरायला येणारे ज्येष्ठ नागरिकही उत्स्फूर्तपणे श्रमदान करत आहेत. जोपर्यंत भागात दमदार पाऊस सुरू होत नाही, तोपर्यंत टँकरद्वारे झाडांना पाणी देण्याचे हे कार्य अविरत सुरूच राहील, असा निर्धार वृक्षमित्र समूहाचे समन्वयक हेमंत खैरनार यांनी व्यक्त केला आहे. या मोहिमेत वृक्षप्रेमी व समाजसेवक योगेश शिंपी यांच्यासह परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी झाडांना पाणी देण्यासाठी मोठे योगदान दिले आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button