Crime

धानोरा येथे रोड रोमियो व टवाळखोरांवर अडावद पोलिसांची धडक कारवाई

धानोरा येथे रोड रोमियो व टवाळखोरांवर अडावद पोलिसांची धडक कारवाई

अडावद प्रतिनिधी पोलीस ठाणे हद्दीतील धानोरा गाव परिसरात महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आणि सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी आज रोजी अडावद पोलिसांतर्फे विशेष गस्त व तपासणी मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान विनाकारण फिरणाऱ्या, शांततेचा भंग करणाऱ्या आणि संशयास्पद वर्तन करणाऱ्या ३ टवाळखोरांवर रंगेहात कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. परिसरात छेडखानी व रोडरोमिओगिरी करणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध अशीच कडक कारवाई यापुढेही सुरू राहील, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

कारवाई करणारे पोलीस पथक:
सपोनी प्रशांत कंडारे (प्रभारी अधिकारी), पीएसआय शरीफ तडवी, सचिन नागरे, जयदीप राजपूत, विशाल तायडे आणि महिला अंमलदार दिव्या मराठे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button