निसर्गमित्र तर्फे मेहरूण तलावावर ०२फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ प्रदेश दिन संपन्न

निसर्गमित्र तर्फे मेहरूण तलावावर ०२फेब्रुवारी रोजी जागतिक पाणथळ प्रदेश दिन संपन्न
जळगाव ;- निसर्गमित्र जळगाव तर्फे ०२ फेब्रुवारी २०२५ जागतिक पाणथळ प्रदेश दिन आयोजित करण्यात आला.जळगावतील ऐतिहासिक मेहरूण तलावावर पक्षी निरीक्षण करण्यात आले व त्या सोबत पाणथळ प्रदेशाचे महत्व सांगणारा जागृती कार्यक्रम घेण्यात आला.पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले.
पाणथळ प्रदेश दिनानिमित्त पाणथळ प्रदेशाचे अधीवस म्हणून असलेले महत्व,हवामान,तापमान बदलास अटकाव करण्याचे पाणथळ जागेचे महत्व,पुर रोखण्याचे महत्व आणि प्रदूषणाने व नफेखोर विकास नीती याचे परिणामी पाणथळ प्रदेश कसे बळी पडत आहेत यावर पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले.
या चर्चे सोबत १२ वर्षांपूर्वी मेहरूण तलाव टाकी सारखा खोल खोदला,सोबत आतील टेकड्या ज्या पक्ष्यांना लपण म्हणुन उपयोगी होत्या,विश्रांती साठी व पंख वाळवण्यासाठी उपयुक्त होत्या आणि त्यांच्या विणी साठी गरजेच्या होत्या त्या तोडण्यात आल्या त्यामुळे या पक्षी अधीवासावर त्याचे दुष्परीणाम होऊन जवळ जवळ ८० ते ९० स्थानिक,देशी व विदेशी स्थलांतर करून येणाऱ्या पक्ष्यांनी कशी पाठ फिरवली याची माहिती दिली.आज त्या परिणामी काही मोजक्याच पक्ष्यांच्या जाती दिसतात अशी माहिती दिली व सोबत पक्षी निरीक्षण करण्यात आले.पक्ष्यांविषयी मार्गदर्शन पक्षीमित्र शिल्पा व राजेंद्र गाडगीळ यांनी केले.
कार्यक्रमात प्रा.गणपत धुमाळे,कार्तिक,धर्मकीर्ती, हर्षिता बाचीपळे, प्रियांशी,राहुल भारुडे,क्रांती भारुडे, कशिश तडवी,प्रगती ठाकूर,विजय,विलास बेर्डे,किर्ती बेर्डे सहभागी झाले होते