Politics

विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

विधान परिषद निवडणुकीच्या पूर्वसंध्येला
अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न

जळगाव, :महाराष्ट्र विधान परिषद जळगाव स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक व नियमबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.

यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी मतदान केंद्रांवरील व्यवस्थापनाबाबत महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मतदान केंद्र परिसरात १०० मीटरचे अंतर नियमांचे काटेकोर पालन करणे, आवश्यक मार्किंग करणे तसेच कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार होणार नाही याची दक्षता घेऊन तात्काळ प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

मतदान केंद्रातील शिस्त व गोपनीयता राखण्यासाठी मतदान कक्षात छायाचित्रण व व्हिडिओ चित्रिकरणास मनाई असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

दिव्यांग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हील चेअरची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली चव्हाण यांनी मतदान पेटी हाताळणीचे प्रात्यक्षिक करून मतदान पेटी उघडणे व बंद करण्याची प्रक्रिया प्रत्यक्ष दाखवत कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

उपविभागीय अधिकारी बबन काकडे यांनी निवडणूक नियम, १९६१ अन्वये मतदान प्रक्रिया, जबाबदाऱ्या व कार्यपद्धतीबाबत पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रशिक्षणामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाजासाठी आवश्यक तयारी व आत्मविश्वास प्राप्त झाल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
0 0 0 0 0

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button