Other

जळगाव शहरातील रथ चौक परिसरात बुधवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना

जळगाव शहरातील रथ चौक परिसरात बुधवारी मध्यरात्री मोठी दुर्घटना

युवासेनेतर्फे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी

जळगाव शहरातील रथ चौक परिसरात दोन वर्षांपूर्वी अंशतः पाडण्यात आलेल्या जीर्ण इमारतीचा उर्वरित भाग बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी पहाटे अचानक कोसळल्याने खाली उभ्या असलेल्या चारचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातील आणखी एका जीर्ण इमारतीलाही मोठे तडे गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
या घटनेनंतर संतप्त नागरिकांच्या भावना लक्षात घेता युवासेनेतर्फे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करत तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
या विषयी योग्य त्या उपायोजना व स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निवेदन युवासेना तर्फे जळगाव शहर महानगरपालिकेच्या आयुक्त आदित्य जिवने यांना देण्यात आले. आयुक्तांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी युवासेना विभागीय सचिव विराज कावडीया, विधानसभा युवाधिकारी अमित जगताप, महानगर युवाधिकारी प्रीतम शिंदे, अजय खैरनार आदी युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button