जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आढावा बैठक पार

जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी आढावा बैठक पार
केळी पीकविमा व निर्यात सुविधा केंद्रांच्या वाढीसाठी चर्चा
मुंबई जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि निर्यात क्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक आज पार पडली.
या बैठकीस मा. ना. श्री. गुलाबरावजी पाटील, मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, जळगाव आणि मा. ना. श्री. जयकुमार रावल, मंत्री, पणन व राजशिष्टाचार विभाग, महाराष्ट्र राज्य उपस्थित होते.
बैठकीत केळी पीकविमा मिळण्यासंबंधी प्रलंबित मुद्द्यांवर तसेच केळी निर्यात सुविधा केंद्रांची क्षमता आणि संख्या वाढविण्याच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी मा. आ. अमोल हरिभाऊ जावळे, आमदार, रावेर तसेच पणन विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कृषी अधिकारी आणि संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
जळगाव जिल्हा हा राज्यातील केळी उत्पादनात अग्रस्थानी असून, शेतकऱ्यांच्या विमा दावे निकाली काढणे, निर्यात साखळी अधिक मजबूत करणे आणि जिल्ह्याला केळी निर्यात केंद्र म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर ठोस निर्णय घेण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.






