जळगावात उद्यापासून ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह’ सोहळा

जळगावात उद्यापासून ‘श्रीमद् भागवत कथा’ व ‘अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह’ सोहळा
बीडचे हरिहरानंद भारती स्वामीजी यांच्या उपस्थितीत होणार सुश्राव्य श्रवण
जळगाव : येथील लक्ष्मी नगर (एम.जे. कॉलेजच्या मागे, वैशाली अपार्टमेंटजवळ) भागात दि. १९ जून ते २६ जून २०२६ या कालावधीत भव्य ‘संगीतमय श्रीमद् भागवत कथा’ आणि ‘अखंड हरिनाम संकीर्तन सप्ताह’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात भागवताचार्य श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्री श्री हरिहरानंद भारती स्वामीजी (श्रीमंत महादुर्ग किल्लेधारूर, ता. धारूर, जि. बीड) यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथा रंगात येईल.
*सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम*
काकड आरती: पहाटे ५:३० ते ६:३०
श्रीमद् भागवत कथा: दुपारी १:०० ते ४:००
हरिपाठ: संध्याकाळी ५:३० ते ६:३०
रोज कीर्तन: रात्री ८:०० ते १०:००
*असे असतील दैनंदिन कीर्तनकार आणि सेवा*
सप्ताहात दररोज रात्री ८ वाजता नामवंत कीर्तनकार व भजनी मंडळाची सेवा होणार आहे:
१९ जून (शुक्रवार): खाटुशाम भजन – दिपक प्रजापती
२० जून (शनिवार): ह.भ.प. मोहनदास महाराज
२१ जून (रविवार): ह.भ.प. अनिल महाराज (एकलग्न)
२२ जून (सोमवार): ह.भ.प. देवगोपाल शास्त्री महाराज (आडगांव)
२३ जून (मंगळवार): सुंदर कांड – सुनय जोशी
२४ जून (बुधवार): ह.भ.प. राधेश्याम महाराज (येवला)
२५ जून (गुरुवार): ह.भ.प. परमेश्वर उगले महाराज
२६ जून (शुक्रवार): ह.भ.प. श्री योगी दत्तानाथ महाराज (शिवखेडा) यांचे काल्याचे कीर्तन होईल.
भव्य शोभा यात्रा: दि. २५ जून २०२६ (गुरुवार) रोजी संध्याकाळी ६:०० वाजता निघेल.
महाप्रसाद: दि. २६ जून (शुक्रवार) रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ‘जगद्गुरु तुकोबाराय वारकरी शिक्षण संस्था’ (एकलग्न, ता. धरणगाव, जि. जळगाव) हे भजनी मंडळ म्हणून साथ देतील. गायनाचार्य म्हणून मयुर महाराज (तरवाडे) व ईश्वर महाराज (हातनूर), तर मृदंगाचार्य म्हणून मयुर महाराज (खापरखेडा) सेवा बजावतील. या धार्मिक सोहळ्याचे आयोजन श्रीमती प्रतिभा ध्रुवराज वारके, पौर्णिमा मनोज वारके, सेजल, भुमि व समस्त वारके परिवार (साकरी) यांच्यातर्फे करण्यात आले असून, सर्व भाविकांनी या कथेचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.






