Social
-
कर आकारणीतील गोंधळाचे निराकरण करा : नगरसेवक अमोल पाटील
कर आकारणीतील गोंधळाचे निराकरण करा : नगरसेवक अमोल पाटील भडगाव (प्रतिनिधी ) भडगाव येथील नगर परिषदेने सन २०२६-२०२७ या आर्थिक…
Read More » -
तुंबलेल्या गटारी, वाढलेले गवत अन् अतिक्रमण; महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांना धरले धारेवर! वॉर्ड क्रमांक २ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी; गलथान कारभार सुधारण्याचे निर्देश, तक्रारींच्या तातडीच्या निवारणाचे आदेश जळगाव, प्रतिनिधी : शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘महापौर स्वच्छता संकल्प अभियानांतर्गत’ शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) वॉर्ड क्रमांक २ मध्ये प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या दौऱ्यात अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारी, रस्त्यांवरील वाढलेले गवत, अतिक्रमण आणि बांधकामाचे साहित्य पडून असल्याचे निदर्शनास आले. स्वच्छतेतील त्रुटींवर नाराजी व्यक्त करत महापौरांनी संबंधित स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांना कामकाजात सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. प्रशासन अधिक पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने महापौरांनी पाहणीदरम्यान नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. वॉर्डात सध्या ३५ कर्मचारी कार्यरत आहेत. घंटागाडीचा संप सुरू असल्याने स्वच्छतेच्या कामासाठी दोन जेसीबी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मात्र, तुंबलेल्या गटारी आणि लहान गल्ल्यांमधील अस्वच्छतेबाबत नागरिकांनी तक्रारी मांडल्या. या समस्यांवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित विभागाला दिले. जोगी नगर परिसरातील गटारींवर झालेले अतिक्रमण हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. बांधकामानंतरचे वेस्ट मटेरियल रस्त्यावर टाकल्याचे आढळल्याने संबंधितांना तातडीने नोटीस बजावण्याचे आदेशही देण्यात आले. रस्त्यांवर वाढलेले गवत काढणे, तसेच नागरिकांच्या मागणीनुसार जुन्या दिव्यांच्या जागी नवीन पथदिवे बसविण्याच्या सूचना विद्युत विभागाला देण्यात आल्या. पुलाखालील अतिक्रमण आणि अस्वच्छतेबाबत नागरिकांनी व्यक्त केलेल्या नाराजीची दखल घेत संबंधित जागा तातडीने स्वच्छ करण्याचे निर्देश देण्यात आले. नागरिकांनी ड्रेनेज कनेक्शन त्वरित घ्यावे, असे आवाहनही महापौरांनी केले. न्यू सीखवाल नगर परिसरातील तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले. वॉर्डातील स्वच्छता अधिक प्रभावी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक निकम आणि त्यांच्या पथकाने दैनंदिन कामाचे योग्य नियोजन करावे, असे निर्देश महापौरांनी दिले. तसेच कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची पडताळणी करण्यासाठी हजेरी रजिस्टर सादर करण्यास सांगण्यात आले. कामकाजात शिस्त राखून स्वच्छतेच्या बाबतीत कोणतीही दिरंगाई होऊ नये, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली. या पाहणी दौऱ्यात नगरसेवक विजय बांदल, सागर सोनवणे, पूजा विजय जगताप, शहर अभियंता आर. टी. पाटील, अभियंता जितेंद्र रंधे, आरोग्य विभागप्रमुख समीर बोरोले, विद्युत विभागाचे सुमित पाटील यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते. शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांचा सहभागही महत्त्वाचा आहे. नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत निराकरण करून स्वच्छता व्यवस्थेत सुधारणा करण्यावर महापौरांनी या दौऱ्यात भर दिला.
तुंबलेल्या गटारी, वाढलेले गवत अन् अतिक्रमण; महापौरांनी स्वच्छता निरीक्षकांना धरले धारेवर! वॉर्ड क्रमांक २ मध्ये महापौर दीपमाला काळे यांची पाहणी;…
Read More » -
गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख; जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर पाटील
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अरविंद देशमुख यांची, तर जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानेश्वर…
Read More » -
सेवा संकल्प अभियानांतर्गत एस. एस. एम. एम. महाविद्यालयात शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन
सेवा संकल्प अभियानांतर्गत एस. एस. एम. एम. महाविद्यालयात शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन पाचोरा येथे विद्यार्थ्यांसाठी समाजकल्याण, बार्टी व जात पडताळणी योजनांची…
Read More » -
कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या; ग्रामस्थांचा इशारा
कोळगावात महात्मा फुले स्मारकासाठी जागा द्या; ग्रामस्थांचा इशारा २५ ऑक्टोबरपर्यंत लेखी निर्णयाची मागणी; अन्यथा २६ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषण भडगाव, प्रतिनिधी…
Read More » -
अमळनेरमध्ये रंगणार ‘गरबा नाईट २०२६ ; सुप्रसिद्ध खानदेशी कलाकारांची राहणार विशेष उपस्थिती
अमळनेरमध्ये रंगणार ‘गरबा नाईट २०२६ ; सुप्रसिद्ध खानदेशी कलाकारांची राहणार विशेष उपस्थिती नवदुर्गा स्त्री शक्ती पुरस्कार सोहळ्यात कर्तृत्ववान महिलांचा गौरव;…
Read More » -
धरणगाव रोडवर रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन; अमळनेर तालुक्यात बिबट्याची भ्रमंती सुरूच, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
धरणगाव रोडवर रात्रीच्या सुमारास बिबट्याचे दर्शन; अमळनेर तालुक्यात बिबट्याची भ्रमंती सुरूच, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अमळनेर: अमळनेर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून…
Read More » -
श्रीयंत्र, महाकाली देवी पूजनाचा श्री मंगळग्रह मंदिरात आध्यात्मिक सोहळा
श्रीयंत्र, महाकाली देवी पूजनाचा श्री मंगळग्रह मंदिरात आध्यात्मिक सोहळा अमळनेर : येथील श्री मंगळग्रह मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार, दि. 12 ऑक्टोबर…
Read More » -
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ
जैन हिल्स येथील जलसंधारण क्षेत्रभेटीतून जल व्यवस्थापनाचा अनुभवला वस्तूपाठ ‘चला जाणूया नदीला’ अभियानांतर्गत कार्यशाळेत झाले विचारमंथन जळगाव, दि. १२…
Read More » -
नवरात्रोत्सव व धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
नवरात्रोत्सव व धार्मिक मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश जळगाव, : नवरात्रोत्सव तसेच जिल्ह्यातील विविध ठिकाणी होणारे बालाजी वहनोत्सव,…
Read More »
