Crime

बोलेरोतून गुटख्याची तस्करी; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर पोलिसांची बोदवड चौफुलीवर कारवाई; उत्तर प्रदेशातील २५ वर्षीय चालक ताब्यात

बोलेरोतून गुटख्याची तस्करी; १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

मुक्ताईनगर पोलिसांची बोदवड चौफुलीवर कारवाई; उत्तर प्रदेशातील २५ वर्षीय चालक ताब्यात

मुक्ताईनगर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची बोलेरो पिकअपमधून अवैध वाहतूक करणाऱ्या चालकाला मुक्ताईनगर पोलिसांनी बोदवड चौफुली परिसरातून ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता तब्बल १५ लाख ८८ हजार ५०० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आढळून आला. गुटखा वाहतुकीसाठी वापरलेले ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे बोलेरो पिकअप वाहनही जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण १९ लाख १३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.

६ ऑक्टोबर रोजी मुक्ताईनगर पोलिसांना वाहन क्रमांक HR-८४/१०७३ मधून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय व विश्वसनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी संबंधित वाहनाचा पाठलाग करून मुक्ताईनगर शहरातील बोदवड चौफुली येथे वाहनासह चालकाला ताब्यात घेतले.

चालकाकडे वाहनातील मालाबाबत विचारपूस केली असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे वाहन मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात आणून अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पंचांसमक्ष तपासणी करण्यात आली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा आढळून आला.

जप्त मुद्देमालामध्ये १० लाख १२ हजार ५०० रुपये किमतीचे प्रिमियम राजनिवास सुगंधित पान मसाल्याचे ६ हजार ७५० पाकिटे, ५ लाख ७६ हजार रुपये किमतीचे प्रिमियम जेड एन-०१ जाफरानी जर्द्याचे ६ हजार पाकिटे आणि ३ लाख २५ हजार रुपये किमतीचे पांढऱ्या रंगाचे महिंद्रा बोलेरो पिकअप वाहन, क्रमांक HR-८४/१०७३, यांचा समावेश आहे.

या प्रकरणी शुभमसिंग विद्यराम, वय २५, रा. निनावाचा, ता. किरावली, जि. आग्रा, उत्तर प्रदेश, याच्याविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी किशोर सूर्यवंशी यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गुन्हा रजि. नं. ३९१/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १२३, २२३, २७४, २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ मधील कलम ३०(२)(a), २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(d), २७(३)(e), ३१ सहवाचन ३(i)(zz)(v) अन्वये कारवाई करण्यात आली असून, शिक्षापात्र कलम ५९ व ६३ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदिप गावित आणि मुक्ताईनगर उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील, पोलीस अंमलदार रविंद्र धनगर आणि प्रशांत चौधरी यांनी कारवाईत सहभाग घेतला.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आशिष आडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार पाटील करीत आहेत.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button