Other

भररस्त्यात मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना एलसीबीने केले जेरबंद

भररस्त्यात मोबाईल हिसकावणाऱ्या दोघांना एलसीबीने केले जेरबंद

गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई; जबरी चोरीतील मोबाईल हस्तगत, संशयित जळगाव शहर पोलिसांच्या ताब्यात

जळगाव | प्रतिनिधी

जळगाव शहरातील जिल्हा परिषद कार्यालयासमोर भररस्त्यात दुचाकीस्वाराला अडवून जबरदस्तीने मोबाईल हिसकावून नेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने गोपनीय माहितीच्या आधारे जेरबंद केले आहे. या कारवाईत चोरीस गेलेला विवो कंपनीचा मोबाईलही हस्तगत करण्यात आला असून पुढील तपासासाठी दोघांना जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

भररस्त्यात मोबाईल हिसकावला

१४ एप्रिल २०२६ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुस्तकीन शेख सईद (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) हे दुचाकीने जिल्हा परिषद कार्यालयासमोरील रस्त्याने जात असताना दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवून पैशांची मागणी केली. पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या जवळील विवो कंपनीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून दोघे पसार झाले. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गोपनीय माहितीवरून उलगडा

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अक्षय मुकेश अटवाल (वय २५, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ, जळगाव) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हा गुन्हा चंद्रकांत रमेश दिवेकर (वय २३, रा. गुरुनानक नगर, शनिपेठ, जळगाव) याच्या साथीने केल्याची माहिती दिली. त्यानंतर चोरीस गेलेला मोबाईल हस्तगत करण्यात आला.

पुढील तपास सुरू

दोन्ही संशयितांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी जळगाव शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल दीपक शिरसाठ करीत आहेत.

कारवाई करणारे पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अक्रम शेख, विजय पाटील, किशोर पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव तसेच पोलीस अंमलदार छगन तायडे, रवींद्र कापडणे, राहुल रगडे आणि प्रदीप सपकाळे यांनी केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button